मुले महत्वपूर्ण आहेत भारत आमच्याविषयी संपर्क करा सण्डेस्कूल अवकाशकालीन बायबल शाळा माझे सीएमयू: प्रशिक्षण
विश्वासाचे वीर रविवार शाळेमध्ये आपले स्वागत आहे! अभ्यासाच्या हया श्रृंखलेत आपण इब्री 11 मध्ये असणा-या विश्वास वीरांबद्दल पाहणार आहोत. आपल्या शारीरिक जीवनापेक्षा आपले आत्मिक जीवन आधिक महत्वाचे असल्यामूळे आपण हे शिकणार आहोत कि आपण विश्वासाचे जीवन कसे जगू शकतो. आपण हे देखील तपासू कि आपल्या दैनंदिन जीवनातील साधारण निर्णयापेक्षा आत्मिक निर्णय महत्वाचे आहेत. नंतर आपण ज्या स्त्री पुरूषांशी देव बोलला, आणि जे त्याच्यासाठी जगले त्यांच्या जीवनाचे परिक्षण केल्या नंतर हया प्रश्नांचे उत्तर देउ. ते आपल्यासाठी उदाहरण आहेत. कधी कधी आपण लोकांनी केलेल्या चांगल्या गोष्टी पाहतो आणि इतर वेळेस आपण त्यांच्या चूकांकडून शिकू शकतो.