Warning: include_once(../analyticstracking.php): failed to open stream: No such file or directory in /hermes/bosnacweb09/bosnacweb09ay/b2512/ipw.pro-vism/public_html/InternationalWebsite/marathi/engines/theme-header.php on line 69

Warning: include_once(): Failed opening '../analyticstracking.php' for inclusion (include_path='.:/usr/share/php') in /hermes/bosnacweb09/bosnacweb09ay/b2512/ipw.pro-vism/public_html/InternationalWebsite/marathi/engines/theme-header.php on line 69
 

तुमचे इंजिन सुरू करा

पवित्र शास्त्राप्रमाणे, ख्रिस्तासोबतची आपली वाटचाल ही केवळ निष्क्रीय घटना नाही, ती एक शर्यत आहे! आपण आणि लेकरांनी जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे आणि ही शर्यत जिंकल्यामुळे या जगात आपल्याला या जगामध्ये छानसा करंडक मिळणार नाही, जो फिका पडेल किंवा कपाटात हरवला जाईल, परंतु सार्वकालीक पारितोषिक मिळणार आहे.


‘‘शर्यतीत धावणारे सर्वच धावतात पण एकालाच बक्षिस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल . स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रियदमन करितो;  ते नाशवंत मुगूट मिळविण्यासाठी असे करितात, आपण तर अविनाशी मूगूट मिळविण्यासाठी असे करितो.’’  1 करिंथकरांस पहिले पत्र 9:24-25


जर आपण आटोकाट जोर लावला आणि आपल्या सर्वस्वानिशी येशूला अनुसरलो तर आपल्याला सार्वकालीक पारितोषिक मिळणार आहे. या उत्साही आणि वेगवान व्हीबीएसमध्ये आपल्या येशू ख्रिस्तासोबतच्या जीवनाची तूलना म्हणून आपण मोटार सायकल शर्यत पाहाणार आहोत.