मुले महत्वपूर्ण आहेत भारत आमच्याविषयी संपर्क करा सण्डेस्कूल अवकाशकालीन बायबल शाळा माझे सीएमयू: प्रशिक्षण
किती वेळा तुम्ही कुठल्या मुलाला विचारले आहे, “जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा काय बनायला आवडेल?” आपल्या सगळयाकडे एक स्वप्न असतं कि आम्ही काय बनणार आहोत. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवतो कि काही मोठे काम करण्यासाठी तो आमचा उपयोग करेल. हे कुठल्याही शाळेत, आमच्या मंडळीत, राजकारणात, रूग्णालया मध्ये, कुठल्याही संस्थेमध्ये काम करतांना या संसारात/जगात पोहचण्या द्वारे होवू शकते.
परमेश्वराला प्रत्येक क्षेत्रात योग्य लोकांची गरज आहे, आणि आपण त्यांच्या पैकि एक होण्यासाठी आशा ठेवू शकतो. ज्या प्रकारे आपण स्वप्न पाहतो कि परमेश्वर आपला उपयोग करेल, त्याच प्रकारे आमच्या मंडळीतील आणि समाजातील मुलांमध्ये पण असते. ते हया गोष्टीची आशा बाळगतात आणि स्वप्न पाहतात कि एक दिवस ते काय बनतिल. ते परमेश्वरा बाबत स्वप्न पाहतात कि त्यांच्या जीवनासाठी त्याची मोठी योजना असेल.
आनंदाची बातमी ही आहे कि परमेश्वराजवळ त्यांच्या जीवना बद्दल महान योजना आहे.
खेदाची गोष्ट ही आहे कि खुप लोक चुका करतात आणि परमेश्वराच्या महान योजने पासून वंचित राहतात.